Nashik Crime News : कांदा व्यापाऱ्याचे 6 लाख लुटले; विंचूरला भरदिवसा घडला प्रकार

Nashik News : भरदिवसा कांदा व्यापाऱ्याला अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना येथील पोलिस चौकीसमोरील प्रभू श्रीराम चौकात घडली.
Crime News
Crime Newsesakal

Nashik News : भरदिवसा कांदा व्यापाऱ्याला अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना येथील पोलिस चौकीसमोरील प्रभू श्रीराम चौकात घडली. लासलगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धूम स्टाइल दुचाकीवरून आलेल्या लुटारुंमुळे कांदा व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. (Nashik crime 6 lakh stolen from an onion traders)

येथील उपबाजार आवारातील कांदा व्यापारी सचिन परदेशी शनिवारी (ता. १) दुपारी शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे अदा करण्यासाठी बॅंकेतून सहा लाख रुपयांची रोकड घेऊन लासलगावहून दुचाकीने विंचूरच्या दिशेने येत असतांना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी येथील वर्दळीच्या प्रभू श्रीराम चौक (तीन पाटी) येथे चालू दुचाकीवरून सचिन परदेशी यांच्या हातातील रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावून पोबारा केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून, पोलिस तपास करीत आहे.

पंधरा दिवसांतील दुसरी घटना

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी लग्नासाठी आलेल्या एका महिलेची चार तोळे सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना ताजी असतानाच त्यातच आता भरदुपारी घडलेल्या चोरीच्या घटनेने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (latest marathi news)

Crime News
Nashik Cyber Crime: स्टॉक IPO अन्‌ शेअरवर बोनसमधून चिक्कार नफा! डॉक्टरला घातला तब्बल दीड कोटींना गंडा; सायबर भामट्यांचा प्रताप

टवाळखोरांचा धुमाकूळ

विंचूर हे मुंबई-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वसलेले आहे. येथे उपबाजार आवार व औद्योगिक वसाहतीमुळे वर्दळ वाढलेली आहे. त्यामुळे व्यापार-व्यवसायात वृद्धी झाली आहे. मात्र, त्याचबरोबर गुन्हेगारी देखील वाढीस लागली आहे.

विंचूर परिसर टवाळखोर व टपोरींचा अड्डा बनले आहे. धूम स्टाईलने दुचाकीवरून येऊन महिलांच्या अंगावरील दागिणे आणि व्यापाऱ्यांच्या पैशावर दिवसा दरोडा टाकणाऱ्या लुटारुंचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Crime News
Nagpur Crime News : घरात आढळले बाप-लेकाचे मृतदेह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com