
Nashik Crime : माऊली मल्टीस्टेट व संकल्पसिद्धीमध्ये आर्थिक फसवणूक प्रकरणातील संशयित विष्णू व रुपचंद भागवत बंधूंचे अपहरण करण्यात आले असता, गुरुवारी (ता. २९) दोघांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी शहर गुन्हेशाखेच्या पथकाने एकाला अटक केली असून, सरकारवाडा पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Abduction release of Bhagwat brothers marathi news)
रुपचंद रामचंद्र भागवत (रा. गवंडगाव, ता. येवला) यांच्या फिर्यादीनुसार, विष्णू भागवत व रुपचंद भागवत हे बुधवारी (ता. २८) नाशिक जिल्हा न्यायालयात कामकाजानिमित्ताने आले होते. रात्री सात ते आठ वाजेच्या दरम्यान दोघेही पायी सीबीएस चौकात आले असता, त्यावेळी काळ्या रंगाच्या स्कोडा कारमधून (एमएच ०४ डीएन९६७७) आलेल्या संशयितांनी दोघांना बळजबरीने बसवून अपहरण केले.
स्कोडा कारसह यावेळी एक एक्सयुव्ही व पांढर्या रंगाचीही कार होती. भागवत बंधूचे अपहरण करून वाहने त्र्यंबकेश्वर मार्गे वाडिवर्हेवरून मुंबई-आग्रा महामार्गने मुंबईकडे गेली. संशयितांनी यावेळी भागवत बंधुंकडे ४ कोटी १० लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास दोघांना जीवे मारण्याचीही धमकी संशयितांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांसह शहर गुन्हेशाखेच्या पथकांनी संशयितांच्या माग काढत तपास सुरू केला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात पैशांसाठी अपहरण व डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन् सुटकाही
बुधवारी (ता.२८) रात्री अपहरण केल्यानंतर, संशयितांनी रुपचंद भागवत यास पैशांची तजवीज करण्यासाठी लोणी (ता. राहाता, जि. अहमदनगर) येथे सोडले. रुपचंद याने सुटका झाल्यानंतर नाशिक गाठून सरकारवाडा पोलिस ठाणे गाठले. तर, दुपारी विष्णू भागवत यासही संशयितांनी राहाता (जि. अहमदनगर) येथे सोडून दिले. तोही रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झाला. (Latest Marathi News)
हे आहेत संशयित
वेदांत येवला, प्रशांत, संभाजी उर्फ संभ्या, सुनील, राकेश सोनार व आणखी चार अज्ञात संशयित यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिसात अपहरण व डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकाला शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकने अटक केल्याचे समजते.
असे आहे प्रकरण
संशयित भागवत बंधुंनी माऊली मल्टीस्टेट व संकल्पसिद्धी या कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींच्या रुपयांची फसवणूक केली आहे. दामदुप्पट योजने अनेकांचे पैसे गुंतलेले आहेत. याप्रकरणी २०२० मध्ये गुन्हा दाखल होऊन विष्णू भागवत यास अटकही करण्यात आली होती. या योजनांमध्ये गुंतविलेली रक्कम घेण्यासाठी संशयितांनी भागवत बंधूंचे अपहरण केल्याचे समजते आहे. पोलिस चौकशीतून भागवत बंधूंच्या अपहरणामागील कारण स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.