Nashik Crime News : अवैध धंद्यांवर कारवाई; पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे.
Police action on gambling
Police action on gambling esakal

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. गेल्या आठवडाभरात पोलिसांनी अवैधरीत्या देशी दारूविक्रीचे ३२ गुन्हे आणि मटका, जुगारअड्ड्याचे १४ गुन्हे दाखल करीत सुमारे पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दुसरीकडे अवैध मद्याविरोधात कारवाईची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र शहरातील अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.(Action against illegal businesses and seized goods )

गेल्या २१ ते २८ तारखेदरम्यानच्या आठवडाभरामध्ये पोलिस आयुक्तालय हद्दीत अवैधरीत्या देशी दारूची विक्री व साठा केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांतर्गत ३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पोलिसांनी तब्बल ३५ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात सर्वाधिक गुन्हे नाशिक रोड आणि पंचवटी हद्दीत प्रत्येकी पाच गुन्हे दाखल आहेत. तर अंबड, भद्रकाली, उपनगर, म्हसरूळ हद्दीतही अवैध मद्याविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे.

याचप्रमाणे अवैधरीत्या सुरू असलेल्या मटका, जुगार अड्ड्यांविरोधातही शहर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. या आठवड्यात विविध पोलिस ठाण्यांमधील १४ जुगारअड्डे उद्‍ध्वस्त करण्यात आले असून, ३९ हजार ६१० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. अंबड हद्दीमध्ये सर्वाधिक चार जुगारअड्ड्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. अवैध धंद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.

Police action on gambling
Nashik Crime News : शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट! दुचाकी, चारचाकींसह रिक्षा चोरीचे प्रकार उघडकीस

अवैध धंद्यांविरोधातील कारवाई

पोलिस ठाणे ....... अवैध मद्य .......... जुगार/मटका

अंबड ...... ४ ......... ४
नाशिक रोड ........ ५ ......... १
उपनगर ........३ ....... ०
पंचवटी ......... ५ ......... ३
म्हसरूळ ........ ३ ........ २
भद्रकाली ...... ४ ......... १
देवळाली कॅम्प ...... १ ...... ०
सातपूर ..... २ ......... ३
आडगाव ..... १ .... ०
गंगापूर ...... १ ...... ०
सरकारवाडा .... १ ........ ०
मुंबई नाका ....... १ .......... ०
इंदिरानगर ...... १ ....... ०
एकूण ....... ३२ ....... १४
एकूण मुद्देमाल .....३५ हजार ६५५..... ३९ हजार ६१० रु.

Police action on gambling
Nashik Crime News : पतीनेच केला चारित्र्याचा संशयावरून खून; केरसाणेतील घटनेची अखेर उकल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com