The incident of firing and explosion at the petrol pump of Bharat Petroleum at Kandane Phata in Zodge Shivara was caught on CCTV.
The incident of firing and explosion at the petrol pump of Bharat Petroleum at Kandane Phata in Zodge Shivara was caught on CCTV.esakal

Nashik News : झोडगे येथील पेट्रोल पंपावर गोळीबार लुटीचा प्रयत्न अयशस्वी

Nashik : पेट्रोल पंपावर शनिवारी (ता. २५) रात्री दोघा हल्लेखाेरांनी हवेत गोळीबार करत दमबाजी व लूट करण्याचा अपयशी प्रयत्न केला.
Published on

Nashik News : मुंबई-आग्रा महामार्गावरील झोडगे शिवारातील कंधाणे फाट्यावरील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर शनिवारी (ता. २५) रात्री दोघा हल्लेखाेरांनी हवेत गोळीबार करत दमबाजी व लूट करण्याचा अपयशी प्रयत्न केला. दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याचा मोबाईल लुटून धुळेच्या दिशेने पलायन केले. महामार्गावर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. (An attempt to shoot and loot petrol pump at Zodge failed )

गोळीबार व अयशस्वी लुटीचा प्रकार समजताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, हवालदार चेतन संवत्सकर, पोलिस शिपाई नरेंद्र कोळी, देवा गोविंद आदींसह तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरात पाहणी केली.

त्यावेळी हल्लेखोर धुळ्याच्या दिशेने पसार झाल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी धुळ्याच्या दिशेने मोर्चा वळविला आहे. शनिवारी रात्री नऊ ते सव्वानऊच्या सुमारास दुचाकीवर दोन अज्ञात हल्लेखोर आले. त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकावत मालक कुठे आहे अशी विचारणा करत शिवीगाळ केली. त्यानंतर एकाने हवेत गोळीबार करत दमबाजी करुन १५ पेटी द्या अशी धमकी दिली.

The incident of firing and explosion at the petrol pump of Bharat Petroleum at Kandane Phata in Zodge Shivara was caught on CCTV.
Nashik Crime News : गोदाघाटावरील चोऱ्यांमध्ये वाढ! तेलंगणातील पर्यटकांच्या 70 हजारांसह मोबाईल, घड्याळ लंपास

पंपावरील व्यवस्थापक व कर्मचारी तसेच रस्त्यावरील प्रवासी येत असल्याचे पाहून एका कर्मचाऱ्याच्या हातातील मोबाईल लुटून दोघे फरार झाले. गोळीबार व दमबाजीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा पंप मनमाड येथील पंकज खताळ यांच्या मालकीचा आहे. या गोळीबार व लुट प्रकरणी भरत दादाजी बच्छाव यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने लुट केलेल्या मोबाईलचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवत लोकेशनच्या आधारे संशयितांचा धुळे व परिसरात माग काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पंपावर लुटलेला मोबाईल पोलिसांना धुळे येथील शनि मंदिराजवळ मिळून आला. त्यावरुन संशयित धुळे येथील असावेत. अन्यथा भीतीने ते धुळ्याहून गुजरातकडे पसार झाल्याचा अंदाज आहे. पोलिस या प्रकरणी कसोशिने शोध घेत आहेत.

The incident of firing and explosion at the petrol pump of Bharat Petroleum at Kandane Phata in Zodge Shivara was caught on CCTV.
Nashik Crime News : नाशिकरोड परिसरात एकच दिवशी 3 घरफोड्या; चोरट्यांनी लांबविला सुमारे 5 लाखांचा ऐवज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com