
Nashik Crime News : ग्रामीण भागातही दुचाक्या चोरीचे प्रमाण लक्षणीय वाढलेले असताना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेच्य पथकाने दोघा अट्टल दुचाक्या चोरट्यांना अटक केली. या चोरट्यांकडून चोरीच्या २० दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या असून, नाशिकसह ठाणे, पुणे जिल्ह्यातूनही त्यांनी दुचाक्या चोरी केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी विधीसंघर्षितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Attal two wheeler thieves jailed 20 stolen bikes seized)