.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik Crime News : नाशिकरोड येथील कौटूबिंक न्यायालयामध्ये फारकतीच्या दाव्यात न्यायालयाने सुनावणीसाठी पुढची तारीख दिल्यानंतर संबंधित पक्षकार तीन महिलांनी गोंधळ घातला. तसेच महिला न्यायधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संबंधित पक्षकार महिलांना उपस्थित वकील, कर्मचार्यांनी अडविल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी तीनही महिलांविरोधात नाशिकरोड पोलिसात सरकारी कामात अडथळा आणून न्यायालयीन कामकाज बंद पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Attempted attack on woman judge)