
नाशिक : नाशिकरोड येथे बहीण भावामध्ये वडापावचे सेंटर चालविण्याच्या कारणावरून वाद झाला असता, त्यावेळी संशयित बहिणीसह दोघांनी कुरापत काढून भावाला बेदम मारहाण केली. यात भावाचे तीन दात तुटले असून संशयितांनी झार्याने मारल्याने गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.