
नाशिक : दिवाळी सुट्ट्या लागण्यापूर्वीच अट्टल चोरट्यांकडून बंद घरे हेरून त्यांचे लॉक तोडून घरफोड्यांचे सत्र आयुक्तालय हद्दीत सुरू झाले आहे. पंचवटी परिसरातील म्हसरुळ हद्दीतील पोकार कॉलनीत बंद बंगला आणि पंचवटी हद्दीतील कमलनयन सोसायटीतील बंद रो हाऊसचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल साडेसात लाखांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली आहे. यामुळे ऐननिवडणुकीत पोलिसांसमोर चोरट्यांचेही आव्हान उभे राहिले आहे. (Burglars broke lock of closed bungalow and row house and looted seven lakh )