
Nashik Crime : पाईपलाईन परिसरातील बंद बंगल्याच्या पाठीमागील खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरफोडी करीत तब्बल साडेआठ लाखांचे सोन्याचे दागदागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी सातपूर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाढत्या घरफोड्याचे आव्हान पोलीसांसमोर उभे राहिले आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेल्या दोघा संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. (Nashik Crime Burglary by cutting windows rod)