
Nashik Crime : राका कॉलनीतील रहिवाशी व माजी नगरसेविका डॉ. ममता पाटील यांचा बंद फ्लॅट फोडून सोन्याचे दागदागिने चोरून नेणार्या तिघा अट्टल घरफोड्यांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अवघ्या १२ तासात जेरबंद केले आहे.
यातील अट्टल घरफोड्या हा पुण्याहून नाशिकला रक्षाबंधनासाठी बहिणीला घेऊन जाण्यासाठी आला असता, त्याला घरफोडीचा मोह आवरता आला नाही आणि घरफोडी केल्यानंतर काही तासातच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, गुन्ह्याची उकल करणाऱ्या पथकाला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ७५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. (Burglary in Raka Colony solved within 12 hours 75 thousand prize to police team)