

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठवडाभरासाठी शहरातून तडीपार केलेल्यांपैकी बहुतांशी सराईत व अवैध व्यावसायिक शहरात खुलेआम वावरत आहेत. यामुळे शहरात आढळलेल्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात काही राजकीय पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार अवैध व्यावसायिकांसह सराईतांविरोधात धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.