Nashik Fake Call Alert: फेक कॉलद्वारे पालकांकडे पैशांची मागणी! सतर्कतेमुळे प्रयत्न फसला, नागरिकांना सावधानतेचा इशारा

Nashik News : ‘मी सायबर क्राइम महाराष्ट्र येथून बोलत असून, तुमचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला आहे. त्याच्याबरोबर आम्ही काही मुली पकडलेली असून, तो रेप करताना पकडला आहे.
Fake Call Alert
Fake Call Alertesakal

Nashik News : ‘मी सायबर क्राइम महाराष्ट्र येथून बोलत असून, तुमचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला आहे. त्याच्याबरोबर आम्ही काही मुली पकडलेली असून, तो रेप करताना पकडला आहे. त्याच्याकडे ड्रग सापडलेले असून, तो आमच्या ताब्यात आहे. काही तडजोड करायची असल्यास साठ हजार रुपये द्यावे लागतील’, अशा आशयाचा तुम्हाला कॉल आला तर सावधानता बाळगा. (Demanding money from parents through fake calls)

हा कॉल फेक तर आहेच; मात्र तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. नाशिक रोड येथील रेल्वेस्थानकाचे स्टेशन उपप्रबंधक प्रसाद रणवत यांना अशाच स्वरूपाचा अनुभव मंगळवारी (ता.७) सकाळी दहाला आला. प्रसाद रणवत यांना फोन आला असता त्यांच्या मुलाने फोन उचलला. फोनवर तिकडून आवाज आला, की प्रसाद रणवत बोलत आहात का.

तुमचा मुलगा अभिषेक याला आम्ही महाराष्ट्र क्राइम ब्रँचने ड्रग्ज घेताना पकडले आहे. त्याच्याबरोबर चार मुली असून, तो बलात्कार करताना पकडला आहे. रणवत यांच्या मुलाने फोन उचललेला असल्यामुळे त्याने हा प्रकार कुठे घडला, असे विचारले. तिकडून आवाज आला, की मुंबई क्राइम ब्रॅंचने त्याला पकडलेले आहे.

येथे मीडियावाले असून, आमचे वरिष्ठ साहेब काही वेळात आल्यावर गुन्हा दाखल होणार आहे. आपल्या मुलावरची कारवाई टाळायची असेल, तर साठ हजार रुपये देऊन तोडजोड करावी लागेल. संबंधित कॉल फेक आहे, हे रणवत यांचा मुलगा अभिषेक याच्या लक्षात आले. अभिषेकने तत्काळ दुसऱ्या मोबाईलने व्हिडिओ रेकॉर्ड केला.

आपली फसवणूक करण्याच्या उद्देशाने हा कॉल असून, आपण स्वतः घरातच आहोत. त्यामुळे या कॉलला उत्तर देणे चुकीचे आहे. त्यांनी तत्काळ फोन कट केला. अशा आशयाचे फोन शहरात अनेकांना येत असून, आपली फसवणूक होऊ नये म्हणून पालकांनी सावधानगिरी बाळगली पाहिजे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

"मला पैसे उकळण्याच्या उद्देशाने फोन आला. तिकडून व्हॉट्सॲपवर कॉल आला. तो रेकॉर्ड होत नाही. समोरून थेट मुलाला पकडले आहे आणि पैशांची मागणी झाली. मात्र माझा मुलगा घरातच असल्यामुळे हा कॉल फसवा आहे, हे लक्षात आल्यावर मी केवळ ऐकण्याची भूमिका घेतली. आपणही सजग राहा." - प्रसाद रणवत, रेल्वे स्टेशन उपप्रबंधक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com