Nashik Crime News : आधी मोबाईल चोरला, नंतर युपीआयने आर्थिक फसवणूक

Nashik News : आधी चोरट्यांनी मोबाईल लांबविला अन् त्‍यानंतर या मोबाईलच्‍या साहाय्याने युपीआयद्वारे पैसे बँक खात्‍यात पाठवत तब्‍बल एक लाख ९ हजार ९६० रुपयांची फसवणूक केल्‍याचा प्रकार समोर आला आहे.
Crime
Crimeesakal

Nashik News : आधी चोरट्यांनी मोबाईल लांबविला अन् त्‍यानंतर या मोबाईलच्‍या साहाय्याने युपीआयद्वारे पैसे बँक खात्‍यात पाठवत तब्‍बल एक लाख ९ हजार ९६० रुपयांची फसवणूक केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. देवळाली कॅम्‍प येथील आठवडे बाजारातून हा मोबाईल चोरतांना चोरट्यांनी आर्थिक फसवणूक केली आहे. (First mobile stolen then UPI financial fraud)

याप्रकरणी दीपक सखाराम सरकटे (रा. देवळाली कॅम्‍प पोलिस वसाहत) यांनी देवळाली कॅम्‍प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार गेल्‍या २ जूनच्‍या सायंकाळी साडेसातला देवळाली कॅम्‍प आठवडे बाजार येथून चोरट्यांनी त्‍यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविला.

इतक्‍यावरच न थांबता चोरट्यांनी मोबाईलमधील युपीआय ॲपचा वापर करताना ४९ हजार रुपये रक्‍कम स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्‍या कलकत्ता येथील बँक खात्‍यात पाठविली. (latest marathi news)

Crime
Crime News: पोलिसांची मोठी कारवाई, पाच लुटारुंना काही तासातच केले जेरबंद!

हा व्‍यवहार यशस्‍वी झाल्‍यानंतर चोरट्यांनी आणखी ५० हजार रुपये कलकत्ता येथील अन्‍य एका स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्‍या खात्‍यात पाठविली.

मोबाईल चोरल्‍याच्‍या २४ चोरट्यांनी ही रक्‍कम हस्तांतरित करताना यासोबत ९६० रुपये रक्‍कम ऑनलाइन खर्च केल्‍याचे उघडकीस आले आहे.

Crime
Nashik Crime News : पिकअप मध्ये डांबून कत्तलीसाठी चाललेल्या 9 गायींची सूटका!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com