Nashik Crime News : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली उच्चशिक्षितांना गंडा; सायबर पोलिसात गुन्हा दाखल

Nashik Crime : सायबर भामट्यांकडून अलिकडे शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचे आमिष दाखवून पैशांचा हव्यास असलेल्या गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचा नवीन फंडा सुरू केला आहे.
crime
crimeesakal

नाशिक : सायबर भामट्यांकडून अलिकडे शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचे आमिष दाखवून पैशांचा हव्यास असलेल्या गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचा नवीन फंडा सुरू केला आहे. आत्तापर्यंतच्या चार गुन्ह्यांमध्ये सायबर भामट्यांनी कोट्यवधींचा गंडा घातला असून, नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्यात उच्चशिक्षित इंजिनिअरसह त्याच्या दोघांना तब्बल ४८ लाखांची फसवणूक केली आहे. (Nashik Crime teacher cheated in share trading marathi news)

याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोड परिसरात राहणार्या ३४ वर्षीय इंजिनिअर युवकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्याच्यासह दोन मित्रांनी शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविले असता, त्यांची ४७ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर भामट्यांनी २० सप्टेंबर ते २३ फेब्रुवारी या दरम्यान गंडा घातला आहे.

याप्रकरणी व्हॉट्सअप क्रमांक 7041116371, 9479475042, 9881165583, 9355616924, 7289976985, 9171313959, 8959704419, 9528871634, 8954132586 आणि तक्रारदारांचे पैसे वर्ग झालेले बँक खातेधारकांविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी आयपी अॅड्रेस, चॅटिंग व लोकेशननुसार तांत्रिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.

ट्रेडिंगमधुन जादा परताव्याचे आमिष

शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाला ३ कोटी ७० लाखांना अशाचरितीने सायबर भामट्यांनी गंडा घातला आहे. तसेच, एका सेवानिवृत्त व्यक्तीलाही सुमारे अडीच कोटींची फसवणूक केली आहे. या सेवानिवृत्त व्यक्तीने कर्ज काढून संशयितांना पैसे दिले होते. आयुष्याची जमापूंजी गेल्याचे काहींनी पोलिसांसमोर रडतरडत कथन केले होते. (Latest Marathi News)

crime
Nashik Crime News : इंस्टाग्राम अकाउंटवरील फॉलोवर्सद्वारे आरोपी ताब्यात

दरम्यान, एका गुन्ह्यात सायबर पोलिसांनी परप्रांतीय तरुणास अटक केली असता, त्याच्या बँक खात्यावर काही तासांसाठी २० लाख रुपये आले आणि काही तासांतच ते इतरत्र वर्ग झाले होते. ज्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले, त्या १०० हून अधिक बँक खात्यांच्या केवायसी बनावट आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे बनविण्यात आल्याचे समोर आले आहे.

बनावट ॲपचा वापर

सायबर भामट्यांनी शेअर ट्रेडिंगचे उभेउभं बनावट शेअर ट्रेडिंग ॲप बनविलेले आहे. त्यामुळे सावज हेरून संशयित ते बनावट ॲप खरे असल्याचे भासविले जाते. त्यामुळे ट्रेडिंग करताना २० लाखांची गुंतवणूक केल्यास थोडक्या कालावधीतच ते ३५ ते ४० लाख झाल्याचे दिसते. त्यामुळे गुंतवणूकदाराला हव्यास वाढतो आणि तो आणखी गुंतवणूक करतो.

प्रत्यक्षात जेव्हा ते पैसे काढण्यासाठी प्रयत्न गुंतवणूकदाराकडून केला जातो, त्यावेळी मात्र ते पैसे काढता येत नाहीत. सायबर भामटेही त्यावेळी या ना त्या प्रक्रियेच्या नावाखाली पैसे उकळतात. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येते तोपर्यंत लाखोंची फसवणूक झालेली असते.

''कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडल्यास फसवणूक होण्याची शक्यताच नसते. परंतु जादा परताव्याच्या आमिषांना भूलल्याने फसवणूक होते. त्यामुळे खात्री करूनच आर्थिक गुंतवणूक करावी.''- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा.

crime
Nashik Crime News : जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com