Nashik Crime News : अट्टल घरफोड्यास निमाणीतून अटक! 3 गुन्ह्यांची उकल

Nashik News : पंचवटी परिसरात गेल्या चार महिन्यांत घरफोड्या करणाऱ्या अट्टल घरफोड्या संशयिताला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.
House burglary suspect in Panchavati area. Panchavati police station team next door.
House burglary suspect in Panchavati area. Panchavati police station team next door.esakal

Nashik News : पंचवटी परिसरात गेल्या चार महिन्यांत घरफोड्या करणाऱ्या अट्टल घरफोड्या संशयिताला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. निमाणी बसस्थानक परिसरातून अटक करण्यात आलेल्या या संशयिताकडून दोन लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस चौकशीतून आणखी गुन्हे उकल होण्याची शक्यता आहे. (house burglar arrested from Nimani)

अस्लम अतिफ शेख असे अटक करण्यात आलेल्या अट्टल घरफोड्या संशयिताचे नाव आहे. पंचवटी परिसरात सातत्याने घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना करीत गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सांगितले होते.

दरम्यान, पोलिस अंमलदार संदीप मालसाने यांना संशयित अस्लम हा निमाणी बसस्थानक परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला आणि अस्लम यास अटक केली. पोलिस चौकशीतून त्याने तीन घरफोड्यांची कबुली दिली आहे. या घरफोड्या त्याने साथीदार पोपट शंकर कणिंगध्वज याच्या मदतीने गेल्या चार महिन्यांत केल्याची कबुली दिली आहे. (latest marathi news)

House burglary suspect in Panchavati area. Panchavati police station team next door.
Dhule Crime News : धुळ्यात 137 जणांवर गुन्हा; संशयितांचे धरपकडसत्र सुरू

त्याच्याकडून तीन घरफोड्यांतून चोरलेले सात तोळे सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल, असा दोन लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हवालदार दीपक नाईक गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

संबंधित कामगिरी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर, सागर कुलकर्णी, दीपक नाईक, अनिल गुंबाडे, महेश नांदुर्डीकर, कैलास शिंदे, संदीप मालसाने, नीलेश भोईर, राकेश शिंदे, अंकुश काळे यांच्या पथकाने बजावली आहे.

House burglary suspect in Panchavati area. Panchavati police station team next door.
Crime News: मालाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com