Nashik Crime News : वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिने चोरीला; इंदिरानगरमधील घटना

Nashik Crime : घरात असलेले सोन्याचे दागिने चोरीच्या भितीपोटी कोण-कुठे लपवून ठेवेल याचा नेम नाही. काही जण धान्याच्या कोठीत, तर काही जण घरात अडगळीच्या जागेत दागिने लपवितात.
thief
thiefesakal

नाशिक : घरात असलेले सोन्याचे दागिने चोरीच्या भितीपोटी कोण-कुठे लपवून ठेवेल याचा नेम नाही. काही जण धान्याच्या कोठीत, तर काही जण घरात अडगळीच्या जागेत दागिने लपवितात. मात्र इंदिरानगरमध्ये चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. विशेष म्हणजे ही बाब महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Jewelry kept in washing machine stolen )

योगेश बिलचंद बोरसे (रा. कमलपुष्प हौसिंग सोसायटी, महारुद्र कॉलनी, चार्वाक चौक, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी शिवणकाम करते. त्यामुळे त्यांच्याकडे नेहमी महिलांचे येणे-जाणे असते. १८ मार्च रोजी ते मूळ गावी भायगाव (मालेगाव) येथे लग्नाला जाऊन आले. आल्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांची १ लाख १० हजारांची सोन्याची तीन पदरी चैन आणि ४५ हजार रुपयांचा सोन्याचा नेकलेस असा १ लाख ५५ हजार रुपयांचे दागिने घरातील वॉशिंग मशिनमध्ये ठेवले होते.

thief
Nashik Crime News : पिकअप जीपमधून गांजाची वाहतूक; कथित साधूसह तिघांना अटक

त्यानंतर त्यांचे सासरे आजारी असल्याने ते पुन्हा गावी गेले. त्यावेळी त्यांच्या मुलाचे कॉलेज सुरू असल्याने घराची चावी शेजार्यांकडे दिली होती. ३ एप्रिल रोजी त्यांना येसगाव (ता. मालेगाव) येथे लग्नाला जायचे असल्याने त्यांच्या पत्नीने वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिने पाहिले असता, त्यांना सापडले नाहीत. दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार मुकेश ढवळे हे तपास करीत आहेत.

thief
Nashik Crime News : समृद्धीवर 43 लाखांचा गांजा पकडला; महाराष्ट्र सुरक्षा फोर्सची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com