Nashik Crime: तोतया पोलिस भासवून बंटी-बबलीकडून सुरू होती लूट! येवला तालुका पोलिसांकडून एकाला अटक, एक फरार

Latest Crime News : गेल्या काही दिवसांपासून येवला तालुका परिसर व शहर परिसरात नारायण येवले (रा. कुसमाडी) व त्याची साथीदार शोभा साबळे हे दोघे बंटी बबली जोडी तोतया पोलिस बनून रस्त्यावर वाहने अडवित वेगवेगळ्या कारणाने पैसे गोळा करणे, ग्रामीण भागात फेक रेड करून हप्ते व खंडणी गोळा करत होते.
A police officer with the accused who pretended to be a policeman.
A police officer with the accused who pretended to be a policeman.esakal
Updated on

येवला : पोलिस असल्याचे भासवून वाहने अडवून लूट करणाऱ्या दोघांचा तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.यातील एकाला अटक झाली असून एक जण फरार झाला आहे. (Loot started from Bunty Babli pretending to be police)

गेल्या काही दिवसांपासून येवला तालुका परिसर व शहर परिसरात नारायण येवले (रा. कुसमाडी) व त्याची साथीदार शोभा साबळे हे दोघे बंटी बबली जोडी तोतया पोलिस बनून रस्त्यावर वाहने अडवित वेगवेगळ्या कारणाने पैसे गोळा करणे, ग्रामीण भागात फेक रेड करून हप्ते व खंडणी गोळा करत होते.

सदरची तक्रार तालुका पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी नारायण येवले याला अटक केली तर त्याची साथीदार शोभा साबळे ही फरार होण्यात यशस्वी झाली आहे.आरोपी येवले हा काही काळ पोलिस मित्र म्हणून काम करीत होता, अशी चर्चा ही परिसरात आहे. पुढील अधिक तपास येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलीस नितीन पानसरे, सागर बनकर, दौलत ठोंबरे, पंकज शिंदे आदी करत आहेत. (latest marathi news)

A police officer with the accused who pretended to be a policeman.
Jalgaon Crime News : मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप! विखरण येथील महिलेची पुराव्याअभावी सुटका

दरम्यान, हाच उद्योग करणारे अजून पाच - सहा जण परिसरात असून ही टोळी ग्रामीण भागात पान टपरी, किराणा दुकान, हॉटेल, आदी ठिकाणांना आपले लक्ष करतात, व गुटखा, वा इतर बेकायदेशीर काही आढळल्यास एफआयआर दाखल करण्याची धमकी देत व पैसे उकळून निघून जातात, अशीही चर्चा परिसरात आहे. अशा भामट्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

A police officer with the accused who pretended to be a policeman.
Jalgaon Crime News : जिल्‍हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com