
Nashik Crime News : गेल्या जुलै महिन्यात चांदवड-लासलगाव रोडवर मद्यतस्करी करणार्या वाहनाच्या पाठलागाचा थरार रंगला असताना एक्साईजच्या (राज्य उत्पादन शुल्क) वाहनाला अपघात होऊन एक अंमलदार ठार व दोघे गंभीर जखमी झाले होते.
मात्र मद्यतस्करी करणाऱ्या क्रेटावाहनाचा चालकाला तब्बल दोन महिन्यांनी जेरबंद करण्यात ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेला यश आले आहे. या चालकास दमणमधून पोलिसांनी पाळत ठेवून ताब्यात घेतले. (main mastermind behind alcohol smuggled vehicle jailed)