Nashik Fraud Crime : मनमाडला विमा प्रतिनिधीचा करोडो रुपयांच्या ठेवींवर डल्ला

Nashik News : विमा प्रतिनिधीने शेकडो ठेवीदार ग्राहकांना करोडो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Fraud Crime
Fraud Crimeesakal

मनमाड : शहरातील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये काम करणारा संदीप सुभाष देशमुख या विमा प्रतिनिधीने शेकडो ठेवीदार ग्राहकांना करोडो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. ठेवीदारांनी बँकेत एकच गर्दी करून बँक प्रशासनाला धारेवर धरले. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, जळगाव येथील पथक ठाण मांडून बसले आहे. (Manmad insurance agent cheated on deposits worth crores of rupees)

बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगमताने हा प्रकार घडला असावा, अशी जोरदार चर्चा सुरू असली तरी सत्य काय ते चौकशीतून बाहेर येणार आहे. मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली राष्ट्रीयकृत बँक म्हणून युनियन बँक ऑफ इंडिया शाखेकडे ग्राहकांचा कल वाढलेला असतांना बुधवारी (ता. २२) एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने ठेवीदार ग्राहकांचे धाबे दणाणले.

याबाबत चौकशी करीत असलेल्या जळगाव येथून आलेल्या पथकातील अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी घटनेची माहिती दिली. सदर प्रकार हा अत्यंत गंभीर असून, विमा प्रतिनिधी म्हणून बँकेने संदीप सुभाष देशमुख याची कंत्राटी नेमणूक केली होती. बँकेत आलेल्या ग्राहकांना बँकेच्या विम्यासंदर्भात माहिती देण्याचे काम असतांनाही बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीशी संबंध वाढवून त्यास बँकेच्या ठेवी कामात शिरकाव करण्यास वाव दिला.

त्याचा फायदा उचलत सदर व्यक्तीने बँकेत येणाऱ्या ठेवीदारांना विश्‍वासात घेत त्यांच्या मुदत ठेवी करून घेणे, ठेवींचे नूतनीकरण करणे यासह इतर कामे करीत असताना सदर व्यक्तीने शेकडो ठेवीदारांना फसवत ठेवींच्या रक्कमा परस्पर काढल्याचा धक्कादायक प्रकार लक्षात आला. या कंत्राटी विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी, नूतनीकरणासाठी दिलेल्या रकमेचा परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (latest marathi news)

Fraud Crime
Jalgaon Crime News : शहरात पुन्हा खुनाचा थरार! हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेल्या दोघांवर सशस्त्र हल्ला

फसवणूक करतांना या व्यक्तीने बनावट कागदपत्रे, शिक्के तयार केल्याचे समजते. अपहार झाल्याचा प्रकार लक्षात येताच गेल्या दोन दिवसांपासून बँकेचे जळगाव येथील चार सदस्यांचे एक पथक बँकेत ठाण मांडून बसले असून, याबाबत कसून चौकशी करीत आहे. ठेवी हडप केल्याचे लक्षात येताच बँकेतील मुदत ठेवीदारांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच ठेवीदारांची बँकेत एकच गर्दी झाली.

यावेळी बाचाबाचीचे प्रकार घडत आहे. फसवणुकीत ठेवीदारांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दिवसभर बँकेत तणावाचे वातावरण होते. सदर कंत्राटी विमा प्रतिनिधी फरारी असून, त्याच्याविरुद्ध बँक प्रशासनाने आर्थिक गुन्हे शाखेमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात अजून किती मासे गळाला लागतात, हे चौकशीअंतीच कळणार आहे. मात्र, सदर प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Fraud Crime
Crime News: मालाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी

"मनमाड शहरातील शाखेत घडलेला हा प्रकार खरा असून, यासंदर्भात चौकशी सुरू आहे. मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवलेल्या ठेवीदारांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. तसेच, ठेवीदारांच्या पैशाची संपूर्ण जबाबदारी बँक घेत आहे." - अशोक सरोदे, चौकशी अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

"मनमाडमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेवीसंदर्भात बेकायदेशीर मोठा गैरप्रकार झाला आहे. अनेक बँक ग्राहकांचे लाखो रुपये फसले आहेत. बँकेची उपकंपनी असलेल्या विमा कंपनी प्रतिनिधीने हे कृत्य केले आहे. बँकेच्या अधिकृत परिसरात हा प्रकार सुरु असताना जबाबदार बँक अधिकाऱ्यांनी या कडे लक्ष का दिले नाही, हा प्रश्‍न आहे." - नितीन पांडे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, भाजप

Fraud Crime
Crime News : जीम ट्रेनरवर एका स्थानिकाने केला चाकू हल्ला, वाचा काय आहे प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com