Nashik Crime News : गोळीबार प्रकरणी बेदला पोलिस कोठडी; चौकशीत सूत्रधार उघड होण्याची शक्यता

Crime News : ॲड. प्रशांत जाधव यांच्यावरील गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार मयूर बेद यास न्यायालयाने १८ सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
firing case
firing caseesakal
Updated on

नाशिक : सिडकोतील उत्तमनगर येथे फेब्रुवारी २०२२ मध्ये रिपाइं पदाधिकारी ॲड. प्रशांत जाधव यांच्यावरील गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार मयूर बेद यास न्यायालयाने १८ सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चौकशीतून ॲड. जाधव यांच्यावर गोळीबार करण्यासाठी सुपारी देणाऱ्याचे नाव उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ॲड. प्रशांत जाधव यांच्यावर फेब्रुवारी २०२२ मध्ये गोळीबार झाला होता. (mayur Bed in police custody in case of firing )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com