
Nashik News : खिरमाणी (ता. बागलाण) येथील विवाहितेला नवीन शेतजमीन खरेदीसाठी पैसे न आणल्याचा राग मनात धरून तिच्या पतीनेच विहिरीत ढकलल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (ता.१३) घडली. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. फोपीर (ता. बागलाण) येथील माहेरवाशीण असलेल्या योगिता ऊर्फ अंजनाबाई देविदास भदाणे (वय ३५) असे दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे. (murder against husband who pushed married woman into well )