
नाशिक : साडगाव (ता. नाशिक) येथील वृद्ध दांपत्याच्या खुनाची उकल करण्यात अखेर नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने भाऊबीजेच्याच दिवशी ६५ वर्षीय बहीण आणि ७० वर्षीय मेहुण्यास (दाजी) लाकडी दांडक्याने मारून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयिताला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सोमनाथ सावळीराम बेंडकोळी (वय ५०, रा. लाडची शिवार, ता. नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. (Murder of brother in law with sister in sadgaon )