Nashik Crime News : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; दोघांनी केला पोबारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; दोघांनी केला पोबारा

नाशिक : सिडकोतील अश्विननगरमध्ये मध्यरात्रीच्या वेळी अंधारात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अंबड पोलिसांनी जेरबंद केले. संशयितांकडून लोखंडी कोयत्यासह, मिरची पावडर व दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, दोघे संशयित अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या हातून निसटले.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

अक्षय संजय क्षीरसागर (१९, रा. राजरत्ननगर, उत्तमनगर, सिडको), गौरव रमेश पाटील (२३, रा. महाकाली चौक, सिडको), मोबिन तन्वीर कादरी (२५, रा. उपेंद्रनगर, सिडको) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, वैभव राजगीर (१९, रा. घरकुल योजना, अंबड), लक्ष्मण राजेंद्र कोळी (२०, रा. घरकुल योजना, अंबड) हे दोघे पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. राजगीर वगळता उर्वरित सर्व संशयित हे सराईत गुन्हेगार आहेत.

हेही वाचा: Nashik Crime News : लष्कराच्या दारूचा काळाबाजार उघड!

शनिवारी (ता. १७) पहाटेच्या सुमारास अंबड पोलिस ठाण्याचे पथक अश्विननगर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना अंधारात संशयितांच्या हालचाली निदर्शनास आल्या. पोलिसांनी दबा धरून संशयितांना घेराव घालत जेरबंद केले. तरीही संशयित राजगीर व कोळी हे दोघे अंधाराच्या फायदा घेत पोलिसांच्या तावडीतून निसटले. तर अक्षय, गौरव व मोबिन या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून पोलिसांनी कोयता, मिरची पावडर, दोरी असे दरोड्यासाठीचे साहित्य जप्त केले आहे.

हेही वाचा: Nashik News : पक्षी घरात उंदरांचा उपद्रव; पक्षी घराकडे NMCसह पक्षांची पाठ!

याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक शेख हे पुढील तपास करीत आहेत. संशयित अक्षय, गौरव व मोबीनसह कोळी यांच्याविरोधात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पोलिसांनी सदरची कारवाई पहाटे दोन-अडीचच्या सुमारास केली.