Nashik Crime News : पिकअपसह 3 लाखाचा पोषण आहाराचा तांदुळ जप्त

Nashik Crime : शासकीय पोषण आहारातील ७३ प्लॅस्टिकच्या तांदुळाच्या गोण्या काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पकडल्या.
crime
crimeesakal

Nashik Crime News : शासकीय पोषण आहारातील ७३ प्लॅस्टिकच्या तांदुळाच्या गोण्या काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पकडल्या. राजगुरु महिला बचत गट शैक्षणिक सामाजिक संस्था व छत्रपती शाहु महाराज महिला बचत गट यांच्या गोदामातील या गोण्या होत्या. पिकअपसह ३ लाख रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. ()

याप्रकरणी माजी नगरसेवक राजेश गंगावणे (रा. वर्धमाननगर) व बाजीराव नथू लांडगे (वय ४४, रा. सटाणा नाका) यांच्याविरुध्द कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. येथील बाजार समिती आवारातील धान्य बाजारात महिंद्रा मॅक्स कंपनीच्या पिकअपमधून (एमएच ४१ जी ३२८३) पोषण आहाराचा तांदूळ विक्रीसाठी आला असता सामाजिक कार्यकर्त्यांनी तो पकडला. (latest marathi news)

crime
Nashik Crime News : जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल

पिकअपमध्ये ७५ हजार ३०० रुपये किंमतीचा ७३ गोणी तांदूळ होता. प्रत्येक गोणीत अंदाजे ५१ किलो तांदूळ होते. शुक्रवारी (ता. ८) दुपारी एकच्या सुमारास पिकअप पकडण्यात आली. यासंदर्भात रात्री पावणेबाराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर व तालुक्यात शालेय पोषण आहार व स्वस्त धान्य दुकानातील गहु, तांदुळाची मोठ्या प्रमाणावर काळ्या बाजारात विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, येथे अनेक शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातील वस्तू व धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात आहेत.

crime
Nashik Crime News : मालेगावात बैलगाडीतून अवैध वाळू उपसा तहसिलदारांची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com