Nashik Fraud Crime : वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून जादा कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका युवकाची संशयिताने १ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला.
याप्रकरणी अंबड पोलिसात अज्ञात संशयितांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime One frauded for two lakhs by showing lure of commission)
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
सागरप्रसाद सुरेंद्र रॉय (३६, रा. महाजननगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या ७ आणि ८ जून २०२३ या दरम्यान सदरचा प्रकार घडला. टेलीग्राम, व्हॉटसअप तसेच काही मोबाईल नंबर आणि http://ama222.work या साईटवरून ही फसवणूक झाली आहे.
रॉय हे फार्मास्युटीकलशी संबंधित व्यवसाय करतात. याच व्यवसायाशी संबंधित काही वस्तूंच्या खरेदी विक्रीवर तुम्हाला चांगले कमिशन मिळू शकते, असे सांगून अज्ञात संशयिताने त्यांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले.
ट्रेडींग चेन बिझनेसप्रमाणे सदस्य जोडले जातील तसे कमिशन वाढत जाईल असे आमिष त्यांना दाखविण्यात आले. रॉय यांनी १ लाख ६९ हजार रूपयांची गुंतवणूक केली. संबंधित वस्तू विकून २ लाख ७५ हजार ६०० रुपये मिळणे अपेक्षित होते.
परंतु हे पैसे पाहिजे असतील तर अधिक वस्तू घ्याव्या लागतील असे संशयिताने त्यांना सांगितले. आर्थिक फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने रॉय यांनी अंबड पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली.
त्याुसार अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.