.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक, पंचवटी : आडगाव नाका परिसरातील उच्चभ्रू इमारतीत छुप्या पद्धतीने कुंटणखान्यावरील छाप्याच्या कारवाईनंतर पोलिस ॲक्शन मोडमध्ये आली आहे. याप्रकरणी अटकेतील महिलेच्या चौकशीनंतर पवन क्षीरसागर यास पोलिसांनी अटक केली आहे. दोघे भागिदारीत व्यवसाय चालवत असल्याचे समोर आल्यानंतर आडगाव पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संशयित एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. (Pawan Kshirsagar arrested in brothel case)