
जुने नाशिक : महिलेची पर्स लांबवून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यास मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयिताने फोन पे ने केलेल्या व्यवहारातून पोलिसांनी त्याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने त्याच्या मुसक्या आवळल्या. अवघ्या काही तासांत गुन्हे शोध पथकाने गुन्हा उघडकीस आणला. (Purse thief arrested)