
नाशिक : मध्य वैतरणा धरण प्रकल्पाच्या ठिकाणी पूर्वपदावर रुजू झाल्यावर त्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे भासवून त्या मोबदल्यात १० हजारांची लाच मागत ती घेताना दुय्यम अभियंत्याला अटक कऱण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात कारवाई केली आहे. कोचाळे (ता. मोखाडा, जि. पालघर) येथील मध्य वैतरणा प्रकल्पाचा दुय्यम अभियंता प्रवीण किसन बांबळे (वय ४६, रा. जय भवानी रोड, नाशिक रोड) असे लाचखोराचे नाव आहे. (Rewards for arrest of bribe taking sub engineer of Vaitarna project )