Nashik Crime News : भीम पगारे खून प्रकरणातील संशयित 10 वर्षांनी न्यायालयात

Nashik Crime : राजीवनगर परिसरामध्ये दहा वर्षांपूर्वी सराईत गुंड भीम पगारे याच्या खून प्रकरणी फरार असलेला संशयित शुक्रवारी (ता.१२) दुपारी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये स्वतःहून हजर झाल्याने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली.
crime
crime esakal

Nashik Crime News : राजीवनगर परिसरामध्ये दहा वर्षांपूर्वी सराईत गुंड भीम पगारे याच्या खून प्रकरणी फरार असलेला संशयित शुक्रवारी (ता.१२) दुपारी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये स्वतःहून हजर झाल्याने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. शरद मारुती चांगले (रा. चांगले चाळ, रामवाडी, पंचवटी) असे न्यायालयात हजर झालेल्या संशयितांचे नाव असून त्यास इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Nashik Crime Suspect in Bhim Pagare murder case in court after 10 years marathi News )

सराईत गुन्हेगार भीम पगारे याचा ९ मे २०१४ रोजी रात्री राजीव नगर परिसरात संशयितांच्या टोळक्याने पाठलाग करीत त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर पगारे जीव वाचवण्यासाठी एका सोसायटीत शिरला असता संशयितांनी त्याच्यावर चॉपर, कोयते, तलवारींनी वार करून त्याचा खून केला होता. या प्रकरणात संशयित किशोर बरू, योगेश शेवरे, भावड्या शेवरे, मंगेश शेवरे, रामदास चांगले, शरद चांगले, गणेश चांगले यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा इंदिरा नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

crime
Nashik Crime News : गावठी कट्ट्यासह तडीपार गुंडाला अटक

दहा वर्षांपासून होता फरार

गुन्हा घडल्यापासून संशयित शरद चांगले हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. गेल्या दहा वर्षांपासून संशयित चांगले पसार होता. दरम्यान शुक्रवारी (ता.१२) दुपारच्या सुमारास संशयित शरद चांगले हा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाघ यांच्यासमोर स्वतः हजर झाला. न्यायालयाच्या आदेशानुसार चांगले याला इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

crime
Nashik Crime News : दोन घटनांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ! आडगाव, मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com