Nashik Crime News : बंगल्याबाहेर बोलत असलेल्या नागरिकाच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या तिघांना अटक

Crime News : त्यांच्याकडून चोरी केलेला पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल व ५० हजारांची दुचाकी जप्त केली आहे.
Crime investigation team of Ambad police station along with three suspects who snatched the mobile phone and forced theft.
Crime investigation team of Ambad police station along with three suspects who snatched the mobile phone and forced theft.esakal

Nashik Crime News : अंबडच्या सद्‌गुरुनगरमध्ये बंगल्याबाहेर मोबाईलवर बोलत असलेल्या नागरिकाच्या हातातील मोबाईल हिसकावून जबरी चोरी करणार्‍या तीन संशयितांना अंबड पोलीस ठाण्याच्या गन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल व ५० हजारांची दुचाकी जप्त केली आहे. (Nashik Crime Three arrested for snatching mobile phone)

शमशाद करीम अन्सारी (२०, रा. औदुंबर बस स्टॉप, नाशिक), राजन सुंदर कनोजिया (२०, रा. तोरणानगर, सिडको), हासिम हारून खान (२३, रा, अंबड लिंक रोड, अंबड) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ तारखेला रात्री अरुण पाटील हे रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मोबाईलवर बोलत होते.

त्यावेळी संशयित दुचाकीवरून आले. काही समजण्याच्या आत संशयितांनी पाटील यांच्या हातातून मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाटील यांनी प्रतिकार केला असता दोघांनी त्यांच्या तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केली. संशयितांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेचे अंमलदार समाधान शिंदे यांना चोरट्यांची खबर मिळाली. (latest marathi news)

Crime investigation team of Ambad police station along with three suspects who snatched the mobile phone and forced theft.
Yavatmal Crime : उमरखेड येथील युवकाचा मृत्यू संशयास्पद;अनाथ दत्ताच्या मारेकऱ्याला गजाआड करण्याची मागणी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक के. टी. रोंदळे, पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पवन परदेशी, सचिन करंजे, समाधान शिंदे, तुषार मते, अनिल गाढवे, प्रवीण राठोड, दीपक निकम, राकेश पाटील, गणेश झनकर आदिंनी सापळा रचून संशयितांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता.१३) पोलीस कोठडी सुनावली आहे.

Crime investigation team of Ambad police station along with three suspects who snatched the mobile phone and forced theft.
Akola Crime : चौहट्टाचा गुटखा किंग गजाआड ; ७ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त,दहीहंडा पोलिसांची धडक कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com