Nashik Crime News : साडेअठरा लाखांचा गुटखा जप्त; ट्रकसह माल हस्‍तगत

Nashik Crime : अवैधपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई करताना गुन्‍हे शाखेच्‍या युनिट एकने दोघा संशयितांना ताब्‍यात घेतले आहे.
Illegal Gutkha goods seized in the operation of Crime Branch Unit One.
Illegal Gutkha goods seized in the operation of Crime Branch Unit One.esakal

Nashik Crime News : अवैधपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई करताना गुन्‍हे शाखेच्‍या युनिट एकने दोघा संशयितांना ताब्‍यात घेतले आहे. त्‍यांच्‍याकडून सुमारे साडेअठरा लाख रुपयांच्‍या गुटख्याच्‍या साठ्यासह वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक असा एकूण ३० लाख ७ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल हस्‍तगत केला आहे. (Nashik Crime tobacco worth eighteen lakh seized with truck marathi News)

ट्रकचालक अमोल ज्ञानोबा इंगुळकर (३७, रा.कामथडी, ता. भोर जि. पुणे) आणि क्लीनर जाबीर अफजल बागवान (३६, रा. बुधवार पेठ, सातारा) अशी ताब्‍यात घेतलेल्‍या दोघा संशयितांची नावे आहेत. यापूर्वी अवैधरीत्या मद्य वाहतुकीवर कारवाईचा धडाका लावताना आता गुटख्याच्‍या साठ्यावर कारवाई केली आहे. पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांच्‍या सूचनांनुसार गुन्‍हे शाखेचे उपायुक्‍त प्रशांत बच्छाव यांनी कारवाईचे आदेश दिले होते.

Illegal Gutkha goods seized in the operation of Crime Branch Unit One.
Nashik Crime News : प्रेमप्रकरणातून मित्रानेच काढला काटा! नेपाळी युवकाच्या खूनप्रकरणी दोघे जेरबंद

शहरात चोरुन लपून प्रतिबंधित असलेल्या अन्नपदार्थ, तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्‍या सूचना दिल्या होत्‍या. त्याअनुषंगाने गुरुवारी (ता. ४) गुन्हे शाखा युनिट १ मधील हवालदार प्रदीप म्हसदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, ट्रकमध्ये (एमएच- १२-एम. व्ही-७५१०) प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू (गुटखा) वाहतूक केला जातो आहे.

त्‍याअनुषंगाने पेठ रोडकडून भक्तिधामकडे जात असताना दुपारी तीनच्‍या सुमारास धाड टाकत ट्रकची तपासणी केली. पथकाने सापळा लावून ट्रकला अटकाव केला. या ट्रकमध्ये १८ लाख ५७ हजार १२० रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू असा गुटखा आढळून आला. या मालासह ट्रक असा एकूण ३० लाख ०७ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal Gutkha goods seized in the operation of Crime Branch Unit One.
Nashik Crime News : गावठी कट्टा विक्रीसाठी आलेले दोघे जेरबंद; मखमलाबाद रोडवर गुंडाविरोधी पथकाची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com