Nashik Cyber Crime : OLX वरून सामान विक्री करणे दोघांना भोवले; सायबर भामट्यांनी तब्बल 10 लाखांना घातला गंडा

Cyber Crime News : नेहमी वस्तू वा वाहन खरेदीच्या प्रकारात फसवणूक होत असताना, यावेळी मात्र वस्तू विक्रेत्यांनाच सायबर भामट्यांनी तब्बल १० लाखांना गंडा घातला आहे.
Cyber Crime
Cyber Crimeesakal

Nashik Cyber Crime : ओएलएक्स या जुन्या वस्तू-वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या संकेतस्थळाचा वापर करून सायबर भामट्यांनी अनेकांना गंडा घातलेला आहे. नेहमी वस्तू वा वाहन खरेदीच्या प्रकारात फसवणूक होत असताना, यावेळी मात्र वस्तू विक्रेत्यांनाच सायबर भामट्यांनी तब्बल १० लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik ​​selling goods on OLX 10 lakhs cheated by cyber criminals)

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका महिलेसह एका व्यक्तीने आपल्या घरातील जुने साहित्य विक्री करण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात केली होती. त्या वस्तूंचे फोटो संकेतस्थळावर टाकून संपर्क क्रमांक दिला होता. दरम्यान, अज्ञात सायबर भामट्यांनी ५ मे रोजी वेगवेगळ्या वेळेत दोघांशी ९३४३५१०९७१ या क्रमांकावरून संपर्क साधून त्यांनी ओएलएक्सवरील जाहिरातीप्रमाणे सदरील वस्तू खरेदी करण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे, संशयित सायबर भामट्याने एक क्युआर कोड दोघांना पाठविले आणि त्यांचाही क्युआर कोड मागवून घेतला. त्यानंतर संशयितांनी दोघांना पुन्हा संपर्क साधून त्यांना बोलण्यात गुंतवणूक ठेवत संशयित सायबर भामट्यांनी त्यांना काही पैसे सेंड करण्यास सांगितले. (latest marathi news)

Cyber Crime
Cyber Crime: इंस्टाग्रामवर एक क्लिक अन् महिलेने गमावले 2.7 कोटी रुपये; काय आहे प्रकरण?

त्यानुसार दोघांनी पैसे टाकले. यानंतर पुन्हा संशयितांनी ज्याप्रमाणे सांगितले, त्याप्रमाणे त्यांनी प्रतिसाद दिला. याच संधीचा फायदा घेत संशयितांनी दोघांच्या बँक खात्यातून सुमारे १० लाख १५ हजार ४०५ रुपये दुसऱ्या बँक खात्यावर वर्ग करून घेत त्यांना गंडा घातला.

यानंतर संशयिताशी संपर्क तुटला. त्यावेळी त्यांना आपली फसगत झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार संशयित सायबर भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.

Cyber Crime
Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ कायम ; वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन जणांची ६५ लाखांची फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com