Nashik Crime News : गांजा, कुत्ता गोळी विक्री करणाऱ्या दोघांना अटक!

Nashik News : शहरातील कल्लू स्टेडिअम भाग व दगडी शाळेजवळ पोलिसांनी कारवाई करत कुत्ता गोळी व गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून ५८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal

Nashik News : शहरातील कल्लू स्टेडिअम भाग व दगडी शाळेजवळ पोलिसांनी कारवाई करत कुत्ता गोळी व गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून ५८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. येथील कल्लू स्टेडियम जवळ जलील अहमद मोहम्मद शरीफ (वय २५ रा. मुस्लिम नगर) हा कुत्ता गोळी विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Two arrested for selling ganja dog pills)

पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत संशयित जलील कडून ३९ हजाराचा २ हजार ९२५ कुत्ता गोळ्या जप्त केल्या.

दुसरी कारवाई येथील शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दगडी शाळेच्या पाठीमागे जिशान अहमद नफीस अहमद (वय २८ रा. सलीम नगर) हा गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (latest marathi news)

Nashik Crime News
Buldhana Crime : मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला मरेपर्यंत जन्मठेप

पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत जिशानकडून १९ हजार रुपये किमतीचा एक हजार नऊशे ग्रॅम गांजा जप्त केला.

इम्रान सय्यद, दिनेश शेरावते, सचिन बेदाडे, पवारवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर पाटील, पोलिस शिपाई राकेश उबाळे, नीलेश निकम, नवनाथ शेलार, उमेश खैरनार, विनोद चव्हाण आदींनी ही कारवाई केली.

Nashik Crime News
Crime News : पैशाच्या वादातून साळ्याने केला जावयाचा खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com