Nashik Crime : दोघा दुचाक्या चोरट्यांना अटक; 7 लाखांच्या चोरीच्या दुचाक्या जप्त

Crime News : शहर-जिल्ह्यातून चोरलेल्या दुचाक्या ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या दोघा दुचाक्या चोरट्यांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे.
Bike thieves with stolen bikes. A team from Unit Two of the City Crime Branch along with
Bike thieves with stolen bikes. A team from Unit Two of the City Crime Branch along withesakal

Nashik Crime : शहर-जिल्ह्यातून चोरलेल्या दुचाक्या ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या दोघा दुचाक्या चोरट्यांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. संशयितांकडून चोरीच्या ७ लाख १० हजारांच्या ९ दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून पोलीस चौकशीतून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. (Nashik Crime Two bike thieves arrested Stolen two wheelers worth 7 lakh seized marathi news)

दीपक अशोक जाधव (३४, रा. कनाशी, ता. कळवण), सचिन पंढरीनाथ मोरे (२३, सध्या रा. रामलिंग, ता. शिरुर, जि. पुणे. मूळ रा. कनाशी, ता. कळवण) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर, त्यांचा साथीदार योगेश दाभाडे (रा. नामपूर, ता. सटाणा) हा पसार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

शहर परिसरातून दुचाक्या चोरीला जात असल्याने युनिट दोनचे पथक समांतर तपास करीत होते. त्यावेळी पथकाला गोपनीय माहिती मिळाली असता, पथकाने दोघा संशयितांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिताफीने अटक केली. दोघांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून ५ लाख ३० हजार रुपयांच्या सहा दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या.

या दुचाक्या संशयितांनी योगेश दाभाडे याच्या मदतीने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संशयितांनी या दुचाक्या सरकारवाडा हद्दीतून दोन तर, म्हसरुळ, भद्रकाली, पश्चीम देवपूर व सटाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एकेक असा ६ दुचाक्या चोरल्या होत्या. याप्रकरणी संशयितांना संबंधित पोलीसांच्या ताब्यात तपासाकामी देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Bike thieves with stolen bikes. A team from Unit Two of the City Crime Branch along with
Nashik Crime : अट्टल घरफोड्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; हसन कुट्टीला नाशिकमधून अटक

सदरची कामगिरी युनिट दोनचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे, विजय वरंदळ, सुहास क्षीरसागर, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, राजेंद्र घुमरे, सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, संजय पोटींदे यांनी केली.

बेवारस दुचाक्या ताब्यात

मुंबई-आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा येथे उड्डाणपुलाखाली विना नंबरप्लेटच्या तीन दुचाक्या बेवारसरित्या पार्क करण्यात आल्या होत्या. युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेत चेसी क्रमांकावरून शोध घेतला असता त्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. १ लाख ८० हजारांच्या या दुचाक्या सरकारवाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आल्या आहेत.

Bike thieves with stolen bikes. A team from Unit Two of the City Crime Branch along with
Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई; एक कोटी ८३ लाखांचा चरस जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com