
नाशिक : गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील भाजीबाजार चौकात चोरट्यांनी महिलेच्या गळ्याची सोन्याची चैन ओरबडली होती. १७ ऑक्टोबर २०२१ ला रात्री आठच्या सुमारास झालेल्या घटनेतील आरोपीसह चैन खरेदी करणाऱ्या दोघी सराफांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १६) तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दंगल ऊर्फ उमेश अशोक पाटील (वय २८, रा. जय भवानी रोड, नाशिक रोड) असे चैन ओरबडणाऱ्या आरोपीचे नाव आहे. (Two goldsmiths along with Snatcher sentenced to 3 years rigorous imprisonment gold chain )