Nashik Crime News : वणी - पिंपळगाव रस्त्यावर मद्याची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले

Crime News : कळवण विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार ०२ मे रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान पिंपळगाव-वणी रोड, ता. निफाड, जि. नाशिक येथे सापळा रचुन संशयित वाहन क्र. MH- 15-GV-8622 ची तपासणी केली अन...
seized stock
seized stockesakal

वणी : वणी - पिपंळगीव रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य मद्याची वाहतूक करणारे पीकअप वाहन सापळा रचून पकडीत पीकअप मध्ये भाताच्या भुशाच्या (कोंडा) गोण्यांखाली लपवलेले ३ लाख १६ हजार ८०० किंमतीचे मद्याचे बॉक्ससह १० लाख १६ हजार ८०० रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. (Nashik Crime vehicle carrying illegal liquor caught)

लोकसभा निवडणुक २०२४ आदर्श आचारसंहिता काळात, मद्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात, राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाची लोकसभा निवडणुक आदर्श आचासंहिता काळात सुरू असलेल्या रात्रीच्या गस्ती दरम्यान निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कळवण विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार शशिकांत गर्जे, अधीक्षक नाशिक अ. सु. तांबारे, उप अधीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभाग ता ०२ मे रोजी रात्री ११:०० वाजेच्या दरम्यान पिंपळगाव-वणी रोड, पिंपळगाव, ता. निफाड, जि. नाशिक येथे सापळा रचुन संशयित वाहन क्र. MH- 15-GV-8622 ची तपासणी केली.

सदर वाहनामध्ये भाताच्या भुशाच्या (कोंडा) गोण्यांखाली देशी दारु टँगो पंच १८० मिलीच्या एकुण १४४० बाटल्या (३० बॉक्स), इंपेरीअल ब्ल्यु व्हिस्की १८० मिलीच्या ७२० बाटल्या (१५ बॉक्स) व डीएसपी व्हिस्की १८० मिलीच्या ७२० बाटल्या (१५ बॉक्स) असे एकुण ६० बॉक्स असा ३ लाख १६ हजार ८०० चा मद्यसाठा व चारचाकी वाहन असा एकुण रु. १०,१६,८००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Latest Marathi News)

seized stock
Crime News : दारूच्या वादातून मित्रांनीच केली कुख्यात बॅटरीची हत्त्या

सदर कारवाई वेळी किरण देवीदास पवार, वय ३० वर्षे राहणार- मु. पो. खेडगाव, ता. दिंडोरी, शहनवाज सकीर खान, वय २३ वर्षे, बिसमील्लाह बेकरी, उत्तम रोड बस स्टाप जवळ, उत्तम भायंदर वेस्ट, मीरा भायंदर, जि. ठाणे, रविंद्र संजय भवर, वय ३० वर्षे, मु. शाहु नगर, कसवे वणी, ता. दिंडोरी, गोकुळ देविदास डंबाळे, वय २६ वर्षे, मु. पुणेगाव, ता. दिंडोरी, विशाल संपत बागुल, वय- १९ वर्षे व सागर रविंद्र महाले, वय - २१ वर्षे दोघे रा. निंबरपाडा, ता. सुरगाणा या सहा इसमांचे विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातंर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई निरीक्षक चंद्रकांत पाटील, दुय्यम निरीक्षक एम. डी. कोंडे, रा. म. डमरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. के. शिंदे, जवान सर्वश्री. दिपक आव्हाड, गोकुळ शिंदे, विलास कुवर, गोरख गरुड, यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक चंद्रकांत ह. पाटील हे करीत आहेत.

seized stock
Cyber Crime: इंस्टाग्रामवर एक क्लिक अन् महिलेने गमावले 2.7 कोटी रुपये; काय आहे प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com