वणी- जिल्ह्यात मे ते जुलैपर्यंत झालेला वादळी पाऊस तसेच सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत केंद्राने नाशिक जिल्ह्यात विशेष केंद्रीय पथक पाठवून झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करून बाधित शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी तसेच प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत या नुकसानीचा समावेश करून शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी व जिल्ह्यातील खतांची लिंकिंग बंद करण्याच्या मागणीचे निवेदन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन खासदार भास्कर भगरे यांना दिले.