Maharashtra unseasonal rain impact on farmers
esakal
नाशिक : चालू वर्षी गारपीट व वादळी पावसामुळे नाशिक विभागागातील पाचही जिल्ह्यांत शेतीपिकांची अपरिमित हानी झाली आहे. विभागातील एक लाख ७१ हजार २२ हेक्टरवरील पिकांना पावसाने तडाखा दिला. तब्बल दोन लाख ७२ हजार ३११ शेतकरी बाधित झाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावल्याने बळीराजासमोर संकट उभे ठाकले आहे.