Nashik Summer Heat : तीव्र उष्णतेमुळे मिरची, टोमॅटो, कोबी धोक्यात! अभोणा परिसरात वाढत्या उन्हाचा पिकांना फटका

Nashik News : मिरची, टोमॅटो, कलिंगड व कोबीचे पीक या तीव्र उष्णतेमुळे धोक्यात आले आहे. जवळपास चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान परिसरात जाणवत आहे.
Chillies not growing sufficiently due to excessive heat.
Chillies not growing sufficiently due to excessive heat.esakal

अभोणा : गेल्या काही आठवड्यांपासून वाढत्या उष्णतेच्या लाटेचा विपरीत परिणाम येथील परिसरात मोठ्याप्रमाणावर जाणवू लागला आहे. कळवण तालुक्यातील बार्डे, दह्याणे, गोसराणे, कळमथे, जयपूर, भगूर्डी, ओझर, मोहमुख, चणकापूर, दत्तनगर आदी परिसरात मिरची, टोमॅटो, कलिंगड व कोबीचे पीक या तीव्र उष्णतेमुळे धोक्यात आले आहे. (Crops are affected by increasing summer temperature in Abhona)

जवळपास चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान परिसरात जाणवत आहे. टोमॅटो, मिरची व कोबीसाठी लाखो रुपये खर्च करून प्रचंड उष्णतेमुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. या रोगांमुळे लांब मिरचीचे वाण जागेवरच वळून आखूड झाले आहे.

शिवाय पहिला खोडा हाच शेवटचा तोडा ठरल्याने, मिरचीचे पीक सोडून द्यावे लागत आहे. टोमॅटोच्या बाबतीतही वाढत्या उष्णतेमुळे झाड सुकल्याने फुलगळ होत नाही, परिणामी टोमॅटोचे उत्पादन थांबते. (latest marathi news)

Chillies not growing sufficiently due to excessive heat.
Nashik News : तिकीट आरक्षित करूनही कुचंबणा; रेल्वेगाड्यांत आरक्षण केलेल्या प्रवाशांची धावपळ

इतर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असूनही कळवण तालुका पश्चिमपट्ट्यात अजूनही पुरेसे पाणी आहे. मात्र उष्णता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पिकांमध्ये योग्य अन्न घटक तयार होण्यास अडचणी येत आहेत.

"मिरचीच्या प्लॉटसाठी शेत तयार करण्यापासून रोप, रासायनिक खते, फवारण्या यांसाठी एकरी दीड लाख रुपये खर्च करूनही, उष्णतेच्या लाटेमुळे मला मिरचीचे पीक सोडावे लागले. मिरची तोडणीसाठी लागलेल्या मजुरी इतकेही पैसे मिळाले नाही. पहिला खोडा हाच शेवटचा तोडा निघतोय. पाच एकर क्षेत्रातील मिरची व टोमॅटोची हीच परिस्थिती आहे. पुरेसे पाणी असूनही वातावरण व तीव्र उष्णतेमुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे." - अविनाश वाघ, शेतकरी, बार्डे (ता.कळवण)

Chillies not growing sufficiently due to excessive heat.
Nashik Unseasonal rain News : नांदुरी, सप्तशृंगगड परिसरास वादळासह पावसाने झोडपले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com