On the first step, on Wednesday, devotees gathered for darshan on the occasion of Kojagari Poornima. In the second photograph, the queues of devotees in the hall. Devotees bowing before Shri Bhagwati in the last photograph.esakal
नाशिक
Kojagiri Pornima 2024 : कावडधारकांनी आणलेल्या तीर्थजलाने आदिमायेचा जलाभिषेक; लाखो भाविकांची गर्दी
Latest Kojagiri Pornima News : भक्तिमय वातावरणात शेकडो मैलावरून अनवाणी आलेले कावडधारक व पदयात्रेकरूंची लाखावर पावले बुधवारी (ता. १६) पहाटेपासूनच गडावर दाखल झाली.
वणी : ‘सप्तशृंगी मातेचा जयघोष... त्यात विलीन झालेला घुंगरांचा छनछनाट व डफ-ताशांचा निनाद...’ अशा भक्तिमय वातावरणात शेकडो मैलावरून अनवाणी आलेले कावडधारक व पदयात्रेकरूंची लाखावर पावले बुधवारी (ता. १६) पहाटेपासूनच गडावर दाखल झाली. आदिमायेच्या कोजागरी पौर्णिमेच्या उत्सवाला त्यामुळे उधाण आल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी (ता. १५) कोजागरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सप्तशृंगगडावर येणारे सर्व मार्ग कावडधारक व पदयात्रेकरूंच्या गर्दीने ओसंडून वाहत भगवेमय झाले होते. (crowd of lakhs of devotees consecrate Adimaye with pilgrimage water brought by Kavad holders )