
Nashik News : पावसाने काही दिवसांपासून उसंत घेतली होती, धुकेही ओसरल्याचे पाहायला मिळाले. मात्र सोमवार (ता.१९)पासून सप्तश्रृंगगड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मंगळवारी (ता.२०) पुन्हा पावसाला सुरवात झाली, यामुळे काहीशी विश्रांती घेतलेले परिसरातील धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहे. पर्यटकही आवडता स्पॉट असलेल्या ठिकाणी धबधब्यांचा आनंद घेताना दिसले. धबधबे हे गडावरील खास आकर्षण आहेत. (Crowd of tourists at evergreen spot for waterfall )