
Nashik Ganeshotsav 2024 : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आज सात दिवस पूर्ण झाले. मंगळवारी (ता.१७) अनंत चतुर्दशी असून देखावे पाहण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने ते पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे.
पंचवटीतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक देखाव्यांवरच भर दिला आहे. यात मंदिरांचे व भव्य गणेशमूर्तींसह चलतचित्रांचे देखावे साकारत धार्मिक देखाव्यांची परंपरा जपली आहे. (Crowds of Ganesha devotees flock to see decorations)