
नाशिक : शनिवारच्या औद्योगिक सुट्टीसह शासकीय कर्मचाऱ्यांना आलेल्या सलग सुट्यांमुळे शनिवारी (ता.१४) शहराच्या सर्वच भागात देखावे पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली. मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरल्याने शहरातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला. अनंत चतुर्दशीला आता अवघे दोन दिवस असल्याने लाडका गणरायाच्या दर्शनासाठी व सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी सायंकाळनंतर नाशिककरांच्या गर्दीने शहराच्या सर्वच भागातील रस्ते गर्दीने खुलून गेले होते. (Crowds of Ganesha devotees flock to streets of city on weekend )