नाशिकच्या रॉयलच्या सायकल स्वारांनी मायबोलीतील कर्णबधिरांना दिली मायेची उब

नाशिकच्या रॉयलच्या सायकल स्वारांनी मायबोलीतील कर्णबधिरांना दिली मायेची उब
Published on: 
फोटो-27290 अंगणगाव : मायबोली विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत नाशिक येथील सायकलस्वार. नाशिकच्या सायकलस्वारांनी दिली कर्णबधिरांना मायेची ऊब सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २४ : नाशिक येथील रॉयल रायडर्स या स्वयंसेवी संस्थेच्या सायकलस्वारांनी येथील मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना मायेची ऊब दिली. कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या दर्शनासाठी काढलेल्या नाशिक ते कोटमगाव या वारीदरम्यान रॉयल रायडर्सचे शेकडो महिला व पुरुष सायकलस्वार अचानकपणे, मायबोलीच्या प्रांगणात आले आणि या विशेष शाळेचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या वेळी अनेक सायकलस्वारांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. आबा पाटील यांनी या निवासी शाळेला भविष्यात विविध प्रकारचे शालेय साहित्य घेण्यासाठी अर्थसहाय्य केले जाणार असल्याचे घोषित केले. तसेच या वेळी डॉ. आबा पाटील, कर्नल शिवनारायण शर्मा, त्रिलोकीनाथ अग्रवाल, बाळासाहेब गवळी, साहेबराव कासव, रामचंद्र तुंगार, कल्पना शिंदे, अनिल गुंजाळ यांनी अर्थसहाय्य केले. नाशिक ते कोटमगाव या सायकल वारीत दीपाली बैरागी, रेखा ह्याळीज, प्रीती कदम, नूतन सुरवाडे, पुनम पांडे, संतोष जगताप, प्रा. सचिन गोसावी, अनिल वराडे, बाळासाहेब भापकर, प्रमोद नाजगड, सुरेश पाळदे, शेखर स्वामी आदी सहभागी झाले होते. हेमंत पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com