Nashik Unseasonal Rain Damage : वादळी पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान!

Nashik News : वादळी पावसाने पाथर्डी, पिंपळगाव खांब, दाढेगाव भागात भाजीपाला आणि कांद्याचे मोठे नुकसान झाले.
shows the damage to a tomato garden at Pimpalgaon Khamb
shows the damage to a tomato garden at Pimpalgaon Khambesakal

Nashik News : शुक्रवारी (ता. १०) दुपारी दीड तास झालेल्या तुफान वादळी पावसाने पाथर्डी, पिंपळगाव खांब, दाढेगाव भागात भाजीपाला आणि कांद्याचे मोठे नुकसान झाले. गावपरिसरातील नाले दुथडी भरून वाहत होते. या नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने विकण्यासाठी क्रेट्समध्ये भरून ठेवलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. (Damage to vegetables due to stormy rain)

तसेच पाथर्डी फाटा भागात अनेक रो-हाउसमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांच्या हाल झाले. इंदिरानगर भागात दोन ठिकाणी झाडे कोसळली. दुपारी चारला विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पाऊस साडेपाचपर्यंत थैमान घालत होता. पाथर्डी गावातील खंडेराव धोंगडे यांच्या मळ्याशेजारी असणाऱ्या शिंदे खोबरा नाला आणि गावाजवळ असलेल्या धरमगंगा नाल्याला मोठा पूर आला.

या नाल्यांचे पाणी थेट पाथर्डी गावापर्यंत वाहत होते. शेतांमध्ये पाणीच पाणी झाल्याने विकण्यासाठी काढून ठेवलेले कोबी, फ्लावर, टोमॅटो यांचे मोठे नुकसान झाले. टोमॅटोच्या शेतामध्ये बांधलेले बांबू आणि तारा तुटल्याने या बागा भुईसपाट झाल्या. उन्हात ठेवलेला कांदा पावसात भिजल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

पिंपळगाव खांब येथे सोमनाथ बोराडे यांच्या घराजवळ असलेल्या गणेशनगर नाल्याला मोठा पूर आला होता. या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाचे मोठे नुकसान झाले. रामदास जाधव आणि इतर शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या बागेत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. दाढेगाव भागात भाजीपाला आणि कांद्याचे नुकसान झाले. (latest marathi news)

shows the damage to a tomato garden at Pimpalgaon Khamb
Nashik Shantigiri Maharaj : देशासाठी निष्काम भावनेने कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनाच मतदान करा : स्वामी शांतीगिरी महाराज

शासनातर्फे तातडीने पंचनामे करून झालेल्या शेतमालाची नुकसानभरपाई करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान इंदिरानगर भागात रथचक्र चौक आणि जुन्या इंदिरानगर पोलिस ठाण्याजवळ झाड कोसळले. अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी येऊन हे झाड हटविले आणि वाहतूक सुरळीत केली.

सदिच्छानगर मैदानावर तरण तलावाच्या कामासाठी ठोकण्यात आलेले संरक्षक पत्रे भुईसपाट झाले. वासननगर भागात रो-हाउसमध्ये पाणी शिरले. गेल्या वर्षभरापासून सर्वे क्रमांक ९११ मध्ये रस्त्यावरचे पाणी उद्यानात सोडून देण्यात आले आहे. या उद्यानात पाणीच पाणी झाले होते. कॉलनी भागात साचणारे पाणी पावसाळी नाल्यात सोडण्याची मागणी नागरिक करत आहेत.

मात्र ते न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. येथील प्रशांत इखणकर, अशोक देवरे, नितीन वाजे आदींच्या घरांमध्ये पाणी शिरले. टोयोटा शोरूम भागात गोरक्ष विधाटे, राजकुमार गुंजाळ आदींच्या घरासमोर पाण्याचे मोठे तळे साचले होते. अशीच परिस्थिती ज्ञानेश्वरनगर, मुरलीधरनगर, आनंदनगर भागात काही ठिकाणी झाली.

अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून वाहन घेण्यासाठी पाथर्डी फाटा भागात असलेल्या शोरूम्समधील ग्राहकांची तारांबळ उडाली. वाहन घेताना सध्या व्हिडिओ रील बनवणे, फोटो काढणे आदींचा ट्रेंड आहे. मात्र पावसामुळे मिळेल त्या आडोशाला वाहनांची डिलिव्हरी ग्राहकांना मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. काही ठिकाणी तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या मंडपाची वाऱ्यामुळे पडझड झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com