नाशिक- एरवी दुचाकीवरून ट्रिपलसीट प्रवास करतानाचे चित्र सर्रास दिसते. परंतु, आपल्या कुटुंबीयांसह दुचाकीवरून जीवघेणा प्रवास काही दुचाकीस्वार करतात. लहान मुलांसह तीन तर कधी चार-पाच जण एकाच दुचाकीवरून धोकादायकरीत्या प्रवास करत असल्याचे चित्र शहरात सर्रासपणे पाहावयास मिळते आहे. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडलीच तर यातून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वाहनचालकांविरोधात पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा असली तरी दुचाकीचालकाने तरी असा धोका पत्करणेच टाळले पाहिजे.