
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा खर्च मर्यादा ओलांडत असल्याने दारणा धरणातून नाशिक रोड विभागासाठी थेट जलवाहिनी प्रकल्प आता अमृत दोन योजनेतून करण्याची तयारी पाणीपुरवठा विभागाने केली आहे. कुंभमेळासाठी महापालिकेच्या वतीने अंतिम विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.