
नाशिक : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) पक्ष, तसेच महाविकास आघाडी व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार गणेश गिते यांनी नाशिक रोड, जेल रोड भागात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. या वेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते दत्ता गायकवाड हेही प्रचारात सहभागी झाले. या वेळी मतदारांना आवाहन करताना नाशिक पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीचे गणेश गिते हेच निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Datta Gaikwad participation in campaigning Ganesh Gita of Maha Vikas in Nashik Road and Jail Road areas )