Nashik News : दत्ता कराळे पुन्हा नाशिक परिक्षेत्राचे ‘आयजी’!

Nashik News : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पुन्हा दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Dattatraya Karale
Dattatraya Karaleesakal

Nashik News : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पुन्हा दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या गृहविभागाने तसे आदेश जारी केले असून, दोन दिवसांनंतर कराळे हे आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर हे ३१ मेस पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले. (Dattatraya Karale reappointed as Special Inspector General of Police)

त्यामुळे या रिक्त पदावर पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार, शर्मा यांनी शनिवारी (ता. १) पदभार स्वीकारून परिक्षेत्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावाही घेतला होता. सोमवारी (ता. ३) दुपारी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पुन्हा दत्ता कराळे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या ३१ जानेवारीला शासनाने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असता, दत्ता कराळे यांची नाशिक परिक्षेत्राचे आयजीपदी नियुक्ती झाली असता, त्यांनी २ फेब्रुवारीला पदभारही स्वीकारला. डॉ. शेखर यांची पदस्थापना केली नव्हती. त्यामुळे त्यांनी कॅटमध्ये धाव घेतली.

यात त्यांचा कार्यकाळ अपूर्ण, तसेच दोन महिन्यांवर सेवानिवृत्ती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सुनावणी होऊन २० मार्चला न्यायालयाने डॉ. शेखर यांची पुन्हा नियुक्तीचे आदेश दिले असता, त्यानुसार शेखर यांनी पदभार स्वीकारला. (latest marathi news)

Dattatraya Karale
Nashik Lok Sabha Election Result : नाशिकमध्ये धनुष्य चालणार की मशाल पेटणार!

अखेर तेच झाले

नाशिक महसूल विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे हेदेखील ३१ मेस सेवानिवृत्त झाले असता, शासनाने तत्काळ डॉ. प्रवीण गेडाम यांची महसूल आयुक्तपदी नियुक्ती केली. तसे मात्र नाशिक परिक्षेत्राबाबत होऊ शकले नाही. शासनाने अतिरिक्त पदभार शर्मा यांना दिला. त्याचवेळी पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले दत्ता कराळे यांचीच नियुक्ती करणे अपेक्षित होते. शेवटी अखेर तेच झाले. दत्ता कराळे यांची नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निकालानंतर चार्ज

नाशिक परिक्षेत्र अतिसंवेदनशील असल्याने शासनाने तत्काळ रंजन कुमार शर्मा यांची नियुक्ती केली होती. परिक्षेत्रात अहमदनगर सर्वाधिक संवेदनशील असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथे कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मतमोजणीप्रसंगी शर्मा हे नगरमध्ये ठाण मांडणार आहेत.

Dattatraya Karale
Nashik Police : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरविल्यास कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com