
नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेशप्रक्रियेचा श्रीगणेशा झाला आहे. सीईटी सेलतर्फे एमबीए/एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात केली आहे. त्यानुसार पात्रताधारक विद्यार्थ्यांना २५ जानेवारीपर्यंत संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएएच-एमबीए/एमएमएस सीईटी २०२५ चे आयोजन केले जाणार आहे.